भजनी मालिका
← भजनांकडे परत

कावळिया नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळते

kavaliya nahin daya upakar | kalima antar vitalate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कावळिया नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळते ॥१॥ तैसें कुजनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥ कडु भोंपळ्याचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥२॥ तुका म्हणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥३॥