भजनी मालिका
← भजनांकडे परत

कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग

kathin naralachen ang | baheri bhitari ten chang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥१॥ तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥ वरी कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥२॥ मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥३॥ ऊंस बाहेरी दिसे काळा । आंत रसाचा आगळा ॥४॥ तुका म्हणे मोल गोडी ।काय चाड वरील्या खोडी ॥५॥