भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो

kathecha ulangh to adhaman adham | navade jya nam olakha to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥ कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥ निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥२॥ तुका म्हणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥३॥