भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथा सुख करी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची

katha sukh kari katha mukta kari | katha yachi bari vithobachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथा सुख करी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥ कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥ कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरीकथा ॥२॥ कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप कळीकाळासी ॥३॥ तुका म्हणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥४॥