भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथा करोनिया द्रव्य देती घेती । तयां अधोगति नरकवास

katha karoniya dravya deti gheti | tayan adhogati narakavas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथा करोनिया द्रव्य देती घेती । तयां अधोगति नरकवास ॥१॥ रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥ असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥२॥ तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥३॥