भजनी मालिका
← भजनांकडे परत

कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके कैसी सरी

kasturi bhinali jaye mruttike | tayesi anike kaisi sari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके कैसी सरी ॥१॥ लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥ध्रु.॥ तुका म्हणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥२॥