भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासियानें पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह माझा फेडीं आतां

kasiyanen puja karun keshiraja | hachi sandeh majha phedin atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासियानें पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥ उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥ गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥२॥ फळदाता तूंच तांबूल अक्षता । तेथे काय आतां वाहों तुज ॥३॥ वाहूं दक्षिणा तरी धातु नारायण । ब्रम्ह तें चि अन्न दुजें काई ॥४॥ गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥५॥ तुका म्हणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप राम कृष्ण हरी ॥६॥