भजनी मालिका
← भजनांकडे परत

कशासाठीं तुम्हां शरण रिघावें । आमुचें वारावें सुख दु:ख

kashasathin tumhan sharan righaven | amuchen varaven sukh du:kha

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कशासाठीं तुम्हां शरण रिघावें । आमुचें वारावें सुख दु:ख ॥१॥ आमुचें संचित भोग क्रियामान । तुमचें कारण तुम्हीं जाणा ॥२॥ आमुचा तों येथें खुंटलासे लाग । न दिसे मारग मोकळाचि ॥३॥ चोखा म्हणे काय करूं आतां । तुमची हे सत्ता अनावर ॥४॥