भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा

kasaya ya lobhen kelen artabhut | sanga majhen chitta narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥१॥ चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिर नेणे ॥ध्रु.॥ सांवळें रूपडें चतुर्भुज मूर्ती । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥२॥ तुका म्हणे करीं आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगों देऊं ॥३॥