भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया वांचूनि झालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी

kasaya vanchuni jhalon bhumi bhar | tujhya payin thar nahin tari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया वांचूनि झालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥१॥ जातां भलें काय डोळियांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥ काय मुख पेंव श्वापदाचें धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥२॥ तुका म्हणे आतां पांडुरंगाविण । न वांचतां क्षण जीव भला ॥३॥