भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी

kasaya karave tapache dongar | anik apar duhkharasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी॥१॥ कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥ कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं ॥२॥ कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साटीं ॥३॥ तुका म्हणे करीं कीर्तन पसारा । लाभ येईल घरा पाहिजे तो ॥४॥