भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या

kasaya ga maj ghatalen sansarin | chitta payanvari nahin tujhya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥१॥ कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥ नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निर्मीयेलो ॥२॥ तुका म्हणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वांचूनियां ॥३॥