भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा

karuni vinavani payin thevin matha

करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥ अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥ असो नमो भाव आलों तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहें मज पंढरीराया ॥२॥ तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥३॥