भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं

karuni rahon jari atma chi praman | nishchal navhe man kay karun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥१॥ जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां तुमचें ब्रम्हज्ञान । आह्मासी चरण न सोडणें ॥२॥ विरोधें विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥३॥ सांडीमांडीअंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नांवें ॥४॥ तुका म्हणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥५॥