भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनि कडविड । जमा घडिली लगड

karuni kadavid | jama ghadili lagad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥१॥ होतें तें चि झालें । नाम ठायींचें पडीलें ॥ध्रु.॥ उतरलें डाई । उत्तम सुलाख ते ताई ॥२॥ हिंडवितां देशोदेश । तुका म्हणे नाहीं नाश ॥३॥