भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनि जतन । कोणा कामा आलें धन

karuni jatan | kona kama alen dhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥१॥ ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥ प्रिया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥२॥ तुका म्हणे एका । हरीविण नाहीं सखा ॥३॥