भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनी आइती सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे । न येचि देव येतील कामलहरी रे । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी वो रे

karuni aiti satyabhama mandirin re | vat pahe taloni geli ratri re | na yechi dev yetil kamalahari re | padili dushchiti tanv to kavad timakari vo re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूनी आइती सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे । न येचि देव येतील कामलहरी रे । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी वो रे ॥१॥ सर गा परता तुझा कळला भाव । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे । बोलतोसी तें अवघी तुझी माव रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ध्रु.॥ मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा झाली काय रे । मागुती रुद्रासि भेटी दिली तई रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि तरी रे ॥२॥ भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे । नष्टा क्रिया नाहीं मां तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडया कौसल्या रे ॥३॥