भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण

karun taisen pathantar | karunakar bhashan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥ जिहीं केला मूर्तीमंत । ऐसा संतप्रसाद ॥ध्रु.॥ सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥२॥ तुका म्हणे घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥३॥