भजनी मालिका
← भजनांकडे परत

करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें

karot tapadi sadhanen | koni sadho goranjanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥१॥ आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥ पावोत आत्मिस्थिति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥ तुका म्हणे छंद । आम्हां हरीच्या दासां निंद्य ॥३॥