भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्मास्तव जालों सौरा

karmastav jalon saura

कर्मास्तव जालों सौरा । गेलों पंढरपुरा । मा मी गेलों पंढरपुरा । संतसनकादिकां मेळीं डौर वाईला पुरा ॥१॥ चाल रामा घरा करुं प्रपंचेसि वैरा ॥ध्रु०॥ द्वैतभाव कल्पना खोडी सांडी याची आशा । विठ्ठलनाम हेंचि सार जिव्हें प्रेमठसा ॥२॥ अद्वैत भरिन मन भारीना तोडिन भवपाश । क्षमा दया धरिन चित्तीं सर्वभूतीं महेश ॥३॥ ज्ञान ज्ञेय हाचि विचार सर्वमय हरि मा मी सर्वमय हरि । दुजेपण न पंडे दृष्टी एकपण घरोघरीं ॥४॥ वासना खोडि वेगीं टाहो करीन रामनामें मा मी टाहो करीन रामनामें । पुंडलिक पेठ संताचे माहेर तेथें नाचेन मनोधर्मे ॥५॥ विज्ञान हरि आपणचि क्षरला दुजेपणें छंदु थोरु । मा मी दुजेपणें छंदु थोरु । निष्काम स्वरुप सूत्रधारी खरा एकरुपें हरिहरु ॥६॥ त्रिकाळध्यान त्रिकाळ मन हारपलें जेथ । पुरली मनकामना मा मी पुरली मनकामना । वैकुंठ प्रकट आपणचि नाथ ॥७॥ देहुडा पाउलीं वेणु वाहे विटेवरी निट । वोळली कामधेनु युगें अठ्ठाविस वाट ॥८॥ एक वृक्ष क्षरला आपणचि जग सर्वघटीं आत्मारामु । ज्ञानदेवो म्हणे आम्हा पंढरपुरी जाला विश्रामु ॥९॥