भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्माचिया रेखा नुलंघिती अशेषा

karmachiya rekha nulanghiti ashesha

कर्माचिया रेखा नुलंघिती अशेषा । म्हणोनि विशेषा केशवसेवा । रामकृष्णमाळा घाला पा रें गळा ॥ अखंड जीवनकळा राम जपा ॥१॥ करावा विचार धरावा आचार । करावा परिकर रामनामीं ॥२॥ सकळांचा सकळी त्यांतें तूं आकळी । जिव्हा हे वाचाळी रामरती ॥३॥ रिघेरे शरण तुज नाहीं मरण । ठाकिसी चरण श्रीविठ्ठलाचे ॥४॥ निवृत्तिप्रसादें जोडे विठ्ठलनामें घडें । ज्ञानदेव बागडे पंढरिये ॥५॥