भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्म आणि धर्म आचरति जया लागी

karma ani dharma acharati jaya lagi

कर्म आणि धर्म आचरति जया लागी । साधक सिणले साधन साधितां अभागि ॥१॥ गोड तुझें नाम आवडते मज । दुजें विठोबा मना उच्चारिता वाटतसे लाज ॥२॥ भुक्ति आणि मुक्ती नामापासीं प्रत्यक्ष । चार्‍ही वेद साही शास्त्रें देताती साक्ष ॥३॥ काया वाचा चित्त चरणी ठेविले गहाण । बापरखुमादेविवरु विठ्ठलाची आण ॥४॥