भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें

karitan vichar sampadalen varma | samul nishram pariharachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥ मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साठी जीवें भावें नारायणा ॥ध्रु.॥ उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखें चि भला करितां वाद ॥२॥ तुका म्हणे माझें खरें देणें घेणें । तुम्ही साक्षी जाणें अंतरींचें ॥३॥