भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां ताडातोडी । वत्सा माते सोई ओढी

karitan tadatodi | vatsa mate soi odhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करितां ताडातोडी । वत्सा माते सोई ओढी ॥१॥ करित्याचा आग्रह उरे । एक एकासाठी झुरे ॥ध्रु.॥ भुके इच्छी अन्न । तें ही त्यासाठी निर्माण ॥२॥ तुका म्हणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥३॥