भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां कोणाचे ही काज । नाहीं लाज देवासी

karitan konache hi kaj | nahin laj devasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करितां कोणाचे ही काज । नाहीं लाज देवासी ॥१॥ बरे करावे हे काम । धरिले नाम दीनबंधु ॥ध्रु.॥ करुनि अराणूक पाहे । भलत्या साहय व्हावया ॥२॥ बोले तैसीं करणी करी । तुका म्हणे एक हरी ॥३॥