भजनी मालिका
← भजनांकडे परत

करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा

karisi kin na karisi majha angikar | ha maj vichar padila deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥ देसी कीं न देसी पायांचें दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ध्रु.॥ बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । म्हणोनियां जीवा भय वाटे ॥२॥ होईल कीं न होय तुज माझा आठव। पडिला संदेह हाचि मज ॥३॥ तुका म्हणे मी कमाईचे हीण। म्हणऊनि सीण करीं देवा ॥४॥