भजनी मालिका
← भजनांकडे परत

करीन कोल्हाळ । आतां हाचि सर्वकाळ

karin kolhal | atan hachi sarvakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करीन कोल्हाळ । आतां हाचि सर्वकाळ ॥१॥ आतां ये वो माझे आई । देई भातुकें विठाई ॥ध्रु.॥ उपायासी नाम। दिलें याचें पुढें क्षेम ॥२॥ बीज आणि फळ । तुका म्हणे हें चि मूळ॥३॥