भजनी मालिका
← भजनांकडे परत

करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें

karin aisen jagen | velovelan payan lagen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥१॥ प्रेम झोंबे कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥ राहो लोकाचार । पडे अवघा विसर ॥२॥ तुका म्हणे ध्यावें । तुज व्यभिचारभावें ॥३॥