भजनी मालिका
← भजनांकडे परत

करील तें काय नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं

karil ten kay navhe vishvambhar | sevaka daridra laj nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करील तें काय नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥१॥ मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥२॥ तुका म्हणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥३॥