भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावें गोमटें । बाळा माते तें उमटे

karaven gomaten | bala mate ten umate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥१॥ आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हें तें जननी ॥ध्रु.॥ वियोग तो तिस । त्याच्या उपचारें तें विष ॥२॥ तुका म्हणे पायें । डोळा सुखावे त्या न्यायें ॥३॥