भजनी मालिका
← भजनांकडे परत

कापुरें परिमळु दिसे वो अळुमाळु

kapuren parimalu dise vo alumalu

कापुरें परिमळु दिसे वो अळुमाळु । हळु हळु सुढाळू पवनपंथें ॥१॥ पवनीं न माये पवनही धाये । परतला खाय आपणासी ॥२॥ मुखवात नाहीं तरसते बाहीं । नावें दिशा दाही आप घोष ॥३॥ ज्ञानदेवा मौन्य नामाचें तारण । तारक हरिविण दुजा नाहीं ॥४॥