भजनी मालिका
← भजनांकडे परत

कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा

kapo koni majhi man sukhen pidot durjan | tuj hoy sin ten mi na karin sarvatha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥१॥ चुकी झाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वह्या राखिल्या॥ध्रु.॥ नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥२॥ गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें तुका म्हणे जाणावें ॥३॥