भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंठीं राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम

kanthin raho nam | angin bharoniyan prem

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कंठीं राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥१॥ ऐसें द्यावें कांहीं दान । आलों पतित शरण ॥ध्रु.॥ संतांचिये पायीं । ठेवींतो वेळोवेळां डोई ॥२॥ तुका म्हणे तरें । भवसिंधु एक सरें॥३॥