भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंठी नामसिक्का । आतां कळिकाळासी धक्का

kanthi namasikka | atan kalikalasi dhakka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कंठी नामसिक्का । आतां कळिकाळासी धक्का ॥१॥ रोखा माना कीं सिक्का माना । रोखा सिक्का तत्समाना ॥ध्रु.॥ रोखा न मना सिक्का न मना । जतन करा नाककाना ॥२॥ सिक्का न मनी रावण । त्याचें केलें निसंतान ॥३॥ सिक्का मानी हळाहळ । जालें सर्वांगीं शीतळ ॥४॥ तुका म्हणे नाम सिक्का । पटीं बैसलों निजसुखा ॥५॥