भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंसरायें गर्भ वधियेले सात । म्हणोनि गोकुळासी आले अनंत । घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भक्ती

kansarayen garbha vadhiyele sat | mhanoni gokulasi ale anant | ghyavaya avatar jalen hen chi nimitya | asur sanharuni tarave bhakti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कंसरायें गर्भ वधियेले सात । म्हणोनि गोकुळासी आले अनंत । घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भक्ती ॥१॥ जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ध्रु.॥ स्थूळरूप होऊनि धरितसे सानें । जैसा भाव तैसा तयांकारणें । दैत्यांसी भासला सिहीं गजान । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हें ॥२॥ अनंत वर्णी कोणा न कळे चि पार । सगुण कीं निर्गुण हा ही निर्धार । पांगलीं साई अठरा करितां वेव्हार । तो वळितसे गौळियांचें खिल्लार ॥३॥ तेहतिस कोटि तिहीं देवांसी श्रेष्ठ । पाउलें पाताळीं नेणती स्वर्ग मुगुट । गिळिलीं चौदा भूवनें तरि न भरे चि पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उच्छिष्ट ॥४॥ महिमा वर्णु तरि पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती । भावेंविण कांहीं न चले चि युक्ती । राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥५॥