भजनी मालिका
← भजनांकडे परत

कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु

kanoba tujhi ghongadi changali amhansi kan dili vangali ||dhru

कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु०॥ स्वगत सच्चिदानंदें मिळोनी शुध्दसत्त्व गुण विणलीरे । षडगुण गोंडे रत्नजडित तुज श्याम सुंदरा शोभलीरे ॥१॥ काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणलीरे । रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक मुतानें भरलीरे ॥२॥ षडविकार षडवैरी मिळोनि तापत्रयानें विणलीरे । नवाठायीं फाटुनी गेली ती त्त्वां आम्हांसि दिधलीरे ॥३॥ ऋषि मुनि ध्यातां मुखि नाम गातां संदेह वृत्ती विरलीरे । बापरखुमादेविवर विठ्ठले त्त्वत्पादी वृत्ति मुरलीरे ॥४॥