भजनी मालिका
← भजनांकडे परत

कानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे

kanin ghaluniyan boten nad je pahave

कानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे । न दिसतां जाणावें नऊ दिवस ॥१॥ भोंवया पाहातां न दिसें जाणा । आयुष्याची गणना सात दिवस ॥२॥ डोळां घालोनियां बोट चक्र जें पाहावें । न दिसतां जाणावें पांच दिवस ॥३॥ नासाग्राचें अग्र न दिसे नयनीं । तरी तेंची दिनीं म्हणा रामकृष्ण ॥४॥ ज्ञानदेव म्हणे हें साधूचें लक्षण । अंतकाळी आपण पहा वेगीं ॥५॥