भजनी मालिका
← भजनांकडे परत

कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं

kanin dhari bol bahutanchin maten | chat tyaparaten anik nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं ॥१॥ पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतांचे ॥ध्रु.॥ शब्दज्ञानी एक आपुल्याला मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥२॥ तुका म्हणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडीं ॥३॥