भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे । कोणाकडे जाऊं नेंदूं

kanhoba atan tumhi amhi cha gade | konakade jaun nendun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे । कोणाकडे जाऊं नेंदूं ॥१॥ वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदूं ॥ध्रु.॥ ढवळे गाईचें दूध काढूं । एकएकल्यां ठोंबे मारूं ॥२॥ तुका म्हणे टोकवूं त्यांला । जे तुझ्या बोला मानीत ना ॥३॥