भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्हया गोवळु वारिलें न करी

kanhaya govalu varilen na kari

कान्हया गोवळु वारिलें न करी । दसवंती सांगे अवधारी ॥ चौघी माया श्रृंगार करिती । तेथें विघ्नेश्वर जाले मुरारी ॥१॥ आनंदें दोंदिलु नाचे गदारोळें । पायीं घागूरलि नेंवाळें ॥ चर्मदक्षू पडले वेगळे । काढूनियां ज्ञानचक्षु दिधलें डोळेगे बाईये ॥२॥ गौळणी दाहा बारा मिळोनी सोळांची टोळी । एकी म्हणती यातें उभाचि कवळु मा काय करिल ते गौळणीगे बाईये ॥३॥ आणिकी एकी साचा बोले तिचेविण बहुसाल ते राहिलेसे भानुते धरुनी ॥४॥ तव मुक्ता दोन्ही आलिसे धांवोनि म्हणती कृष्णा तूं निघ येथुनि । तीन नानावि तुझा पाठींच लागतील औठावे राहे धरुनि ॥५॥ गौळणी म्हणती बाळा कान्हारे । वेल्हाळा सांडिरे । या मना आळारे । ऐसें ऐकोन बापरखुमादेविवरें विठ्ठलें पवनु गिळितया वेळारेरे ॥६॥