भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांद्यासाठी झालें ज्ञान । तेणें जन नाडिलें

kandyasathi jhalen dnyan | tenen jan nadilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांद्यासाठी झालें ज्ञान । तेणें जन नाडिलें ॥१॥ ऐकाकाम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥ध्रु.॥ पूजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्यातें ॥२॥ तुका म्हणे कैंचें ब्रम्ह । अवघा भ्रम विषयांचा ॥३॥