भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां सांडिसी गृहाश्रम

kan sandisi gruhashram

कां सांडिसी गृहाश्रम । कां सांडिसी क्रियाकर्म । कासया सांडिसीं कुळींचें धर्म । आहे तें वर्म वेगळेंची ॥१॥ भस्मउधळण जटाभारु । अथवा उदास दिगंबरु । न धरि लोकांचा आधारु । आहे तो विचारु वेगळाचि ॥२॥ जप तप अनुष्ठान । क्रियाकर्म यज्ञ दान । कासया इंद्रियां बंधन । आहें तें निधान वेगळेंचि ॥३॥ वेदशास्त्र जाणीतलें । आगमीं पूर्ण ज्ञान झालें । पुराण मात्र धांडोळिलें । आहे तें राहिलें वेगळेंचि ॥४॥ शब्दब्रह्में होसि आगळा । म्हणसि न भियें कळिकाळा । बोधेंविण सुख सोहळा । आहे तो जिव्हाळा वेगळाचि ॥५॥ याकारणें श्रीगुरुनाथु । जंव मस्तकीं न ठेवि हातु । निवृत्तिदास असे विनवितु । तंव निवांतु केवि होय ॥६॥