भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे पुंड्या मातलासी । उभें केलें विठ्ठलासी

kan re pundya matalasi | ubhen kelen viththalasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे पुंड्या मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥१॥ ऐसा कैसा रे तूं धीट । मागें भिरकाविली वीट ॥ध्रु.॥ युगें झालीं अठ्ठावीस । अजुनी न म्हणसी बैस ॥२॥ भाव देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥३॥ तुका म्हणे पुंडलिका । तूं चि भक्त बळिया निका ॥४॥