भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो

kan re nathavisi krupalu devasi | posito janasi ekala to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥ बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥ फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥२॥ तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥३॥ तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥४॥