भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी

kan re na bhajasi hari | tuj kon angikari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी ॥१॥ होईल यमपुरी । यमदंड यातना थोरी ॥ध्रु.॥ कोण झाली लगबग । काय करिसि तेथें मग ॥२॥ कां रे भरला ताठा । करिती वोज नेतां वाटा ॥३॥ तोंडा पडिली खिळणी । जिव्हा पिटिती वोढूनि ॥४॥ कां रे पडिली जनलाज । कोण सोडवील तुज ॥५॥ लाज धरीं म्हणे तुका । नको वांयां जाऊं फुका ॥६॥