भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे माझीं पोरें म्हणसील ढोरें । मायबाप खरें काय एक

kan re majhin poren mhanasil dhoren | mayabap kharen kay ek

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे माझीं पोरें म्हणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥१॥ कां रे गेलें म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ गेलियाचा ॥ध्रु.॥ कां रे माझें माझें म्हणसील गोत । नो सोडविती दूत यमा हातीं ॥२॥ कां रे मी बळिया म्हणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥३॥ तुका म्हणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाई पांडुरंगा ॥४॥