भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥ अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.

kan re majha tuj na ye kalavala | asoni javala hrudayastha ||1 || aga narayana nishthura nirguna | kela shok nenan kanthasphot ||dhru.

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥ अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥ कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति खुंटे चि ना ॥२॥ तुका म्हणे कां हो धरियला कोप । सरलें नेणों पाप पांडुरंगा ॥३॥