भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागें झालें काई । एका तें का नेणसी

kan re gamavilya gai | ali valati tujhi jai | magen jhalen kai | eka ten ka nenasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागें झालें काई । एका तें का नेणसी ॥१॥ केलास फजित । मागें पुढें ही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावतां ॥ध्रु.॥ वोला खोडा खळि गाढी । ऐसा कोण तये काढी । धांवेल का पाडी । तुझी आधीं वोढाळा ॥२॥ चाले चाल धांवें । मी ही येतों तुजसवें । तुका म्हणे जंव । तेथें नाहीं पावली ॥३॥