भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी

kan phaduniyan mudra ten ghaliti | nath mhanaviti jagamaji

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका म्हणे जाय नरक लोका ॥३॥