भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत

kan na vajaven baisoni kathe | aisen aika ho shrote | pandurang tethen | ubha ase tishthat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥ म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥ कथे कांहीं अणुमात्र । नो बोलावा हा वृत्तांत । देवभक्तं चित्त । समरसीं खंडणा ॥२॥ कां वैष्णव पूजावें । ऐका घेईल जो भावें । चरणरजा शिवें । वोडविला मस्तक ॥३॥ ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥४॥ घालोनि लोळणी । तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥५॥